करण्या दृष्टांचा अंत ।शेगावी अवतरले संत ।।संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा
।।🌺जय गाजनन🌺।।माझे चित्त माझे मन।बोले जय गजानन।।जीवनातील प्रत्येक क्षण।गजाननाला अर्पण।।कणांपासून सृष्टी बनली।त्यातील मी एक क्षुल्लक कण।।मात्र प्रत्येक कणात आहे।माझा गजानन।।भक्त मी गजाननाचा।गुरुवार माझा सण।गुरुवारी कामे मार्गी लागती।कठीण असुदे कितीपण।
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष।
कासावीस झालो आताविरह सहावेना ।दर्शनाविना तुझ्यामाऊली राहवेना।।योग्य भेटीचा हादेवा येऊदे सत्वर ।।अधीर झाले मनआणखी वाट पहावेना।।।।गण गण गणात बोते ।।
देवा झाले तुझे उपकार।उघडलेसी तू द्वार।।तुझ्या दर्शनासाठी।आहोत आम्ही तय्यार।।
ध्यानी ध्यास,मनी आससदैव आहे तुझाच भासदूर असो की आसपासचिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास।🌺गण गण गणात बोते🌺
तू सद्गुरु माऊली।आम्ही लेकरं सकळ।।आम्हा लेकरांची सुखदुःख।तुला न सांगताही कळं।।प्रामाणिक प्रयत्न सुद्धा।जेव्हा होतात निष्फळं।।काळजावर उमटती।तेव्हा अपयशाचे वळं।।मग नाम तुझे घेता।आसरा पायरीचा मिळं।।तव कृपेने लाभे देवा।अंगी जगण्याचे बळं।।
करुनी शेगावची वारीमन रमु दे या संसारीराहो गजानना फक्त तुझाच हा ध्यासतुझ्याविना नको मला दुजा हा श्वास ।।येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी,आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी ।।मोठा होता होता कधी तुझा दास झालो हे कळले नाही,आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही ।।घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची,नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची ।।भक्त संकटी पडता न बोलवताही तू धावत येसी,गण गण गणात बोते बोलुनी भक्ता भवपार तारून नेसी ।।वंदुनिया तुजला सकळ जन्म हा सार्थकी झाला,आपल्या भक्तांच्या भेटीसाठी गजानन स्वर्गातून खाली आला ।।💐जय गजानन श्री गजानन💐
करतो मी स्पष्ट।नाही मी गर्विष्ठ।।फक्त झुकतो गजानापुढे।तेच माझ्यासाठी श्रेष्ठ।।🙏जय गजानन माऊली🙏
गजाननच संपूर्ण ब्रह्मांडतर आपण एक क्षुल्लक कण।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन ।।गजाननाच्या भक्तीतउपयोगी नाही धन।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन।।वाचणे शक्य नाही विजय ग्रंथतर फक्त कर तू श्रवण।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन।।जीवनातील त्रास थोडेकर तू सहन।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन।।प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन।।गजानन आपुले गुरूआणि गुरुवार आपला सण।भक्ता एकमुखाने म्हणजय गजानन।।🌺जय गजानन माऊली🌺
श्री गजानन महाराज माझी माऊली
If you like articles on this blog, please subscribe for free via email.
1 टिप्पण्या
श्री गजानन महाराज माझी माऊली
उत्तर द्याहटवा